‘द प्रिन्स’ वाचल्यावर ‘उपाधींमुळे माणसं नाही, तर माणसांमुळे उपाधींना अर्थ प्राप्त होतो’, असं बिनदिक्कत सांगणारा निकोलो मॅकियावेली आजही लोकांना का प्यारा वाटतो, याचं उत्तर मिळतं!

निकोलोने त्याच्या काळापर्यंतच्या घडामोडींवर आधारित राजसत्तांच्या संघर्षाचा आणि परिपाकांचा आढावा घेतला आहे. त्यात जे राजकीय विचारांचं आणि आचारांचं द्वंद्व त्याला दिसलं, त्यातून त्याने भावी राजांसाठी परिपाठ घडवला आहे. निकोलो या सर्व सत्तासंघर्षात सहभागी होता, असं नव्हे. म्हणून त्याने जे सांगितलं, ते एका ‘दूरस्थ विचारवंताचं मनोगत’ ठरतं. यात त्याची ‘इन्व्हॉल्व्हमेंट’ होती, पण ‘कमिटमेंट’ नव्हती.......

‘द प्रॉफेट’मधील विचार मानवी जीवनातील नात्यांची सांधेजोड करणारे, अखिल मानवतेला व्यापणारे, जगण्याचा अंतस्थ हेतू जाणणारे, त्याच्या परिपूर्णतेची कसोटी लावणारे आहेत

‘द प्रॉफेट’मधील विचार थकल्या तृषार्त अवनीवरती पाऊस होऊन बरसणारे अन् मायेने एकेका बीजाला अंकुरणारे. एखाद्या विवेकी वाचकाला खलील जिब्रानमध्ये कदाचित लेह हंटचा ‘अबू बेन आदम’ गवसतो – ‘कल्याण जगाचे करिती जे जन, प्रेम-भावे जगता शिंपून, त्या सर्वांचे देव अवघ्राण, स्वयेंच करतो त्या दीपमान!’  खलील जिब्रान कसा वाटतो? बोरकरांच्या शब्दांत सांगायचं तर ‘आपत्कालीं अन् दीनांवर घन होऊनि जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो.’.......

आपण बांग्ला भाषेशिवाय टागोरांच्या कवितांचा प्रवास समजून घेऊ शकत नाही, त्यांच्या कवितेमागचे भावनिक पदर एखाद्या स्थानिकासारखे उलगडू शकत नाही

उद्या, ७ ऑगस्ट, गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांची पुण्यतिथी. त्यानिमित्त ‘गीतांजली’ हे त्यांचे भावकाव्य उलगडण्याचा हा एक प्रयत्न. टागोरांच्या भावकविता समजून घेण्यासाठी बांग्ला व इंग्रजी या दोन्ही भाषा चांगल्या अवगत असणे नितांत आवश्यक आहे. बांग्ला अवगत नसल्याने या काव्याचे आंतरिक पदर मी उलगडू शकणार नाही, याची जाणीव आहे, पण इंग्रजी कवितादेखील कैक वेळा वाचल्याशिवाय समजतील या भ्रमात राहण्यात काही अर्थ नाही.......

अर्थव्यवस्थेचं वस्त्र चंद्रमौळी झालं आहे. तेव्हा नवीन काही करण्यापेक्षा, आहे त्या वस्त्राची सुबक गोधडी करणं आणि ती वर्षभर वापरणं जास्त सयुक्तिक ठरणार आहे...    

भारत व चीन हे दोनच मोठे देश करोनाच्या कठीण काळात सकल घरेलू उत्पन्न दर शून्याच्या वर ठेवून होते. पण हे दोन देश जगाची ३६ टक्के लोकसंख्या सांभाळत असल्यामुळे यांच्या आर्थिक प्रगतीचे चाक जगाच्या दृष्टीने गतिमान राहणे आवश्यक असते. म्हणून या दोन देशांकडून अपेक्षाही अधिक आहेत. आता भारतात नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होईल. त्यामुळे आतापर्यंतच्या कठीण वाटचालीवरून काही तर्क बांधणं स्वाभाविक आहे.......